Thursday, 8 May 2014

अभिनेत्याची बायको



मला अभिनेता होण टाळता आल असतं..
किंवा तुला अभिनेत्याची बायको होण तरी टाळता आल असतं......
पण जाऊ दे नशिबाचे भोग हे भोगायचे असतात,
सटवाईने लिहिलेले शब्द खोडता येईल असे नसतात......
पुर्वी माझा शब्द तुला हवा-हवासा वाटत होता,
शब्दांमधील अर्थ ही नवा-नवासा वाटत होता......
आज माझे शब्द तुला जुने वाटू लागले आहेत,
शब्दातील प्रेम ही उणे वाटू लागले आहेत.......
तुझ्या कुशीत मला आकाश ठेंगण वाटतं,
तुझ्यासाठी आकाशातील तारे तोडूण आणावसं वाटतं......
हे आणि असे असंख्य वाक्य..............!
आता टिव्ही, सिनेमात ऐकू येऊ लागले...
आणि इथेच आमची गोची झाली......
प्रत्यक्ष जीवनात माझ्या तोंडून जेव्हा तिने हेच वाक्य ऐकले......
तेव्हा आमच्या घराच्या कलादालनात फक्त भांडयाचेच आवाज ऐकू येऊ लागले......
म्हणे खुप फिल्मी झालात तुम्ही......!
मस्तच....! अभिनय करता.......
मनात म्हटंल अभिनय ही माझी नशा आहे, पेशा नाही.......
आणि त्याचा गृहउद्योग करायची माझी मनिषाही नाही.........
चार भिंतिच्या प्रत्येक आवरणाला टीव्ही समजू नकोस...
घराच घरपण जप, घरात आलेल्या माणसाला मालिकेतले एखाद पात्र समजू नकोस....
मी तुझा नवरा आहे....नवरा आहे......नवरा आहे.........
डोळ्यात डोळे टाकून बघ...
तुझ्या डोळ्याच्या कॅमे-याला झूम करू नकोस.....
आणि नवरा...नवरा...नवरा...म्हंटल म्हणून  तीनदा प्यान ही करु नकोस.....

मागे एक शेजारी वारला
खुप जीव होता त्याचा माझ्यावर....
खुप रडावसं वाटल पण अश्रूंना आतल्या-आतच पुसलं......
म्हंटल बायकोच्या नजरेत पडलो तर पुन्हा म्हणेल.....
खुप फिल्मी झालात तुम्ही......!
मस्तच......! अभिनय करता...................................१५/०२/२०१३

No comments:

Post a Comment