Thursday, 22 May 2014

कविता ताजी..दुःख शिळेच...  

काही काळ आशेवर प्रेम जगत..
कालांतराने तेच प्रेम भावनेसह
भर बाजारात दुकान थाटून बसत..
तेंव्हा तमा नसते घेतलेल्या वचनांची 
तेंव्हा भीतीही नसते स्वयमरचित देव-देवतांची..
तेंव्हा असत एकच लक्ष,खऱ्या प्रेमाचा शोध..
जुन होत ते खोट प्रेम, आता मिळेल ते कदाचित..!
खर प्रेम...?


प्रेमाचा भाव कांद्यापेक्षाही वधारला
आधी कांद्यानी रडवलं
आता जो येतो बाजारात
त्याचा चेहरा आधीच काळवंडलेला..
कुणी प्रेम देता का प्रेम..?
प्रेयसीच्या दग्या-फटक्यांनी होरपळलेल्या मनाला
कुणी प्रेम देता का प्रेम...? खर-खुर प्रेम..
तुमच्या हायब्रिडच्या जमान्यात
मिळेल का हो एखाद गावरान प्रेम..?
तुमच्या सिमेंट- कोन्क्रीटच्या शहरात
मिळेल का हो तेव्हढंच " कोन्क्रीट " प्रेम..?
तुमच्या फेविकोल सारख पक्क
तुमच्या त्या बिसलेरी सारख स्वच्छ ..
मिळेल का हो प्रेम .? खर- खुर प्रेम..?
बाजार उठला तरी तिला,खर प्रेम मिळाल नाही
वळून बघावं, मागे थोड..,तर गर्वाला तिच्या ते जमल नाही...
मी आहे अजून तिथेच उभा..थडग बनून प्रेमाचं
असलं कुणी खर जोडपं..,त्यांनी खुशाल येउन बसावं...
घेणार असाल आणा-भाका..तर आयुष्यही मग तसंच जगा
चार दिसाची जिन्दगानी ही....गर्व नसावा फुका उगा....
...........अजय गटलेवार ( अभिनेता )
...........दि-२३/१२/२०१३ १२;१२ PM

No comments:

Post a Comment