Wednesday, 7 May 2014

कविता ताजी..दुखः शिळेच...( प्रेमाचं वर्ष-श्राध्द )



 
एक वर्ष झालं तुला , माझ्यावरती रुसून
 येशील कां ग पुन्हा जवळ, सारा राग पुसून...
 
      चौपाटीच्या दगडालाही, पाझर फुटतो आता 
माझ्याकडे बघून-बघून, रोज फोडतो माथा   
चणेवाला भैय्या भी सारखा बघतो वाकून..

येशील कां ग पुन्हा जवळ.,सारा राग पुसून.....
 
        देवळातले देव म्हणे,तुम्ही येत नाही आता  
पहिल्या दिवशी आले होते,अन मारल्या होत्या बाता  
चपलांचा स्टॅंड वाला,तो हि बघतो हसून
 
येशील कां ग पुन्हा जवळ, सारा राग पुसून.......
 
          मोगऱ्याची फुलं म्हणे,सुई टोचू नका आता 
कुठल्याही धाग्यामध्ये ओउ नका आता 
 जिला आवडायची मी, तीच गेली ना हो सोडून
 
येशील कां ग पुन्हा जवळ.,सारा राग पुसून......
 
          दोष तुझा होता कि दोष होता माझा 
काढली होती खोडी कि कुणी काढला होता काटा..? 
जखम ज्यांनी दिली, त्याला तेच काढतील भरून 
येशील कां ग पुन्हा जवळ,सारा राग पुसून...
 
          एक वर्ष झालं तुला , माझ्यावरती रुसून 
येशील कां ग पुन्हा जवळ.,सारा राग पुसून.........

..........अजय गटलेवार ( अभिनेता )......

No comments:

Post a Comment