Thursday, 22 May 2014

मोक्ष 

आज ना उद्या हि वेळ येणारच होती..
पाखर घरटी सोडून दूर उडून जाणारच होती..

तो काळ वेगळा होता..घर जरी कच्च होत आपल..
तरीही एकेका खांबाला चोचीन पक्क धरल होत आपण..
एका भाकरीची चार तुकडी सर्व मिळून खायची..
कुणी नसलं घरात हजर तरीही दवडित जपून राहायची...
आज काळ बदलला..भूक राहली फक्त खायची...
खाटेवर तडफडत जरी असला तरी धडपड चालू असते न्यायची..
पाप करणारा आनंदाने जगताना बघितला मी..
पुण्य करणारा तडफडून मारताना बघितला मी..
म्हणून म्हणतो पाप करा..! पुण्य करा....!
मोक्ष सर्वांनाच मिळत असतो....

कवी - अजय गटलेवार ( अभिनेता )
कविता ताजी..दुःख शिळेच...  

काही काळ आशेवर प्रेम जगत..
कालांतराने तेच प्रेम भावनेसह
भर बाजारात दुकान थाटून बसत..
तेंव्हा तमा नसते घेतलेल्या वचनांची 
तेंव्हा भीतीही नसते स्वयमरचित देव-देवतांची..
तेंव्हा असत एकच लक्ष,खऱ्या प्रेमाचा शोध..
जुन होत ते खोट प्रेम, आता मिळेल ते कदाचित..!
खर प्रेम...?


प्रेमाचा भाव कांद्यापेक्षाही वधारला
आधी कांद्यानी रडवलं
आता जो येतो बाजारात
त्याचा चेहरा आधीच काळवंडलेला..
कुणी प्रेम देता का प्रेम..?
प्रेयसीच्या दग्या-फटक्यांनी होरपळलेल्या मनाला
कुणी प्रेम देता का प्रेम...? खर-खुर प्रेम..
तुमच्या हायब्रिडच्या जमान्यात
मिळेल का हो एखाद गावरान प्रेम..?
तुमच्या सिमेंट- कोन्क्रीटच्या शहरात
मिळेल का हो तेव्हढंच " कोन्क्रीट " प्रेम..?
तुमच्या फेविकोल सारख पक्क
तुमच्या त्या बिसलेरी सारख स्वच्छ ..
मिळेल का हो प्रेम .? खर- खुर प्रेम..?
बाजार उठला तरी तिला,खर प्रेम मिळाल नाही
वळून बघावं, मागे थोड..,तर गर्वाला तिच्या ते जमल नाही...
मी आहे अजून तिथेच उभा..थडग बनून प्रेमाचं
असलं कुणी खर जोडपं..,त्यांनी खुशाल येउन बसावं...
घेणार असाल आणा-भाका..तर आयुष्यही मग तसंच जगा
चार दिसाची जिन्दगानी ही....गर्व नसावा फुका उगा....
...........अजय गटलेवार ( अभिनेता )
...........दि-२३/१२/२०१३ १२;१२ PM
जिथे सुंदरतेने दगा दिला
हास्यानेही दगाच दिला
अश्या दिखावेबाझ दुनियेत तू
मला जगायला आधार दिला...

......संपलेल्या आशेला लगेच मी
......पुन्हा गोंजारले हाताने 
......तुझ्याकडे बोट दावूनी सांगितले
......आता तुझ्यासाठी जगायला...
गर्दीतला एकटा मी
एकटाच गेलो असतो सरणावर
आता तुझ्या आठवणींची गर्दी
असेल ना सोबत अंतयात्रेला.....

........अजय गटलेवार ( अभिनेता )
........( दि.१७/०२/२०१४ )
 —

Saturday, 10 May 2014

कविता ताजी..दुख शिळेच....

सांग प्रिये,तुले माह्यी आठवण येते का..?
मंग माह्यासारखीच रातची तू दारू पिते का..?


लावायाले मन दिलं..
तोडायाले मन दिलं..

देवान हिच्या मायले - कायले
जलमभराच बंधन दिलं ..
शोधून राह्यलो मले कुणी दुसरी भेटते का..?
अन तुह्यासारखी फसवेगिरी मले बी जमते का..?
सांग प्रिये..............................
देवळात देव नाही...
असं नाही., तुले माहित नाही..!
शपथा घेण सोप झाल..
सांग तेले कोण तोडत नाही...?
काह्यून तुले म्हणन माह्य पटत नाही का..?
तुह्या मनाच..तुह्या मनाशी जमत नाही का..?
सांग प्रिये..............................
सोसायाला त्राण नाही..
विसरावं तर भान नाही...
तुयासाठी जन्मदात्याचा
ठेवला कधी मान नाही...
बघीन तुया पोटी कुणी बाळ रडते का..?
तवा तुयी त्याच्यावरती माया जडते का..?
सांग प्रिये,तुले माह्यी आठवण येते का..?
मंग माह्यासारखीच रातची तू दारू पिते का..?

कवी - अजय गटलेवार
दि-२२/०९/२०१३

Thursday, 8 May 2014

अभिनेत्याची बायको



मला अभिनेता होण टाळता आल असतं..
किंवा तुला अभिनेत्याची बायको होण तरी टाळता आल असतं......
पण जाऊ दे नशिबाचे भोग हे भोगायचे असतात,
सटवाईने लिहिलेले शब्द खोडता येईल असे नसतात......
पुर्वी माझा शब्द तुला हवा-हवासा वाटत होता,
शब्दांमधील अर्थ ही नवा-नवासा वाटत होता......
आज माझे शब्द तुला जुने वाटू लागले आहेत,
शब्दातील प्रेम ही उणे वाटू लागले आहेत.......
तुझ्या कुशीत मला आकाश ठेंगण वाटतं,
तुझ्यासाठी आकाशातील तारे तोडूण आणावसं वाटतं......
हे आणि असे असंख्य वाक्य..............!
आता टिव्ही, सिनेमात ऐकू येऊ लागले...
आणि इथेच आमची गोची झाली......
प्रत्यक्ष जीवनात माझ्या तोंडून जेव्हा तिने हेच वाक्य ऐकले......
तेव्हा आमच्या घराच्या कलादालनात फक्त भांडयाचेच आवाज ऐकू येऊ लागले......
म्हणे खुप फिल्मी झालात तुम्ही......!
मस्तच....! अभिनय करता.......
मनात म्हटंल अभिनय ही माझी नशा आहे, पेशा नाही.......
आणि त्याचा गृहउद्योग करायची माझी मनिषाही नाही.........
चार भिंतिच्या प्रत्येक आवरणाला टीव्ही समजू नकोस...
घराच घरपण जप, घरात आलेल्या माणसाला मालिकेतले एखाद पात्र समजू नकोस....
मी तुझा नवरा आहे....नवरा आहे......नवरा आहे.........
डोळ्यात डोळे टाकून बघ...
तुझ्या डोळ्याच्या कॅमे-याला झूम करू नकोस.....
आणि नवरा...नवरा...नवरा...म्हंटल म्हणून  तीनदा प्यान ही करु नकोस.....

मागे एक शेजारी वारला
खुप जीव होता त्याचा माझ्यावर....
खुप रडावसं वाटल पण अश्रूंना आतल्या-आतच पुसलं......
म्हंटल बायकोच्या नजरेत पडलो तर पुन्हा म्हणेल.....
खुप फिल्मी झालात तुम्ही......!
मस्तच......! अभिनय करता...................................१५/०२/२०१३

Wednesday, 7 May 2014

कविता ताजी..दुखः शिळेच...( प्रेमाचं वर्ष-श्राध्द )



 
एक वर्ष झालं तुला , माझ्यावरती रुसून
 येशील कां ग पुन्हा जवळ, सारा राग पुसून...
 
      चौपाटीच्या दगडालाही, पाझर फुटतो आता 
माझ्याकडे बघून-बघून, रोज फोडतो माथा   
चणेवाला भैय्या भी सारखा बघतो वाकून..

येशील कां ग पुन्हा जवळ.,सारा राग पुसून.....
 
        देवळातले देव म्हणे,तुम्ही येत नाही आता  
पहिल्या दिवशी आले होते,अन मारल्या होत्या बाता  
चपलांचा स्टॅंड वाला,तो हि बघतो हसून
 
येशील कां ग पुन्हा जवळ, सारा राग पुसून.......
 
          मोगऱ्याची फुलं म्हणे,सुई टोचू नका आता 
कुठल्याही धाग्यामध्ये ओउ नका आता 
 जिला आवडायची मी, तीच गेली ना हो सोडून
 
येशील कां ग पुन्हा जवळ.,सारा राग पुसून......
 
          दोष तुझा होता कि दोष होता माझा 
काढली होती खोडी कि कुणी काढला होता काटा..? 
जखम ज्यांनी दिली, त्याला तेच काढतील भरून 
येशील कां ग पुन्हा जवळ,सारा राग पुसून...
 
          एक वर्ष झालं तुला , माझ्यावरती रुसून 
येशील कां ग पुन्हा जवळ.,सारा राग पुसून.........

..........अजय गटलेवार ( अभिनेता )......